जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांनी आता तरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी तीन जणांचा मृत्यू झाला तसेच ५८२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील ४२ आणि तालुक्यातील ७७ असे एकूण ११९, मालेगाव शहरातील २५ आणि तालुक्यातील ९७ असे एकूण १२२, रिसोड शहरातील २३ आणि तालुक्यातील ५३ असे एकूण ७६, मंगरुळपीर शहरातील २३ आणि तालुक्यातील ९९ असे एकूण १२२, कारंजा शहरातील २० आणि तालुक्यातील ३० असे एकूण ५० आणि मानोरा शहरात ८ आणि तालुक्यात ५७ असे एकूण ६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील २७ बाधिताची नोंद झाली असून, ३२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
०००
एकूण पॉझिटिव्ह २९,५७४
ॲक्टिव्ह ४,१६९
डिस्चार्ज २५,०९१
मृत्यू ३१३