वाशिम :वाशिम-अकोला लोहमार्गावर २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३0 वाजताचे सुमारास एका २0 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळुन आला होता. याप्रकरणी मनोरमा कोकास यांनी २७ ऑगस्टला दिलेल्या तक्रारीवरुन तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोकास हे एस.टी. महामंडळामध्ये नोकरीला होते. त्यांचे २४ ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान शेजारच्या लोकांशी जोरदार भांडण झाले होते. तथापी, त्याचा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३0 वाजता लोहमार्गावर मृतदेह आढळुन आला. याप्रकरणी त्यांची आई मनोरमा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीसांनी अवधेश तिवारी, रिंकु तिवारी व रामारती तिवारी रा. वाशिम यांचेविरुध्द भांदविचे कलम ३0२, २0१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपिस अटक केली.
तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
By admin | Published: August 28, 2015 12:09 AM