वाशिम: नाफेडच्या खरेदीसाठी शेतकºयांना खरेदी विक्री संस्थेकडे नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. यानुसार उडिद, मुगाची नोंदणी करण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांसाठी एका हेक्टराला केवळ ३ क्विंटल नोंदणी करण्याची मूभा देण्यात आली आहे.
पणन संचालकांनी शासकीय खरेदीसाठी शासनाकडे १५ दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठविला असून, याला मान्यता मिळाली नसतानाच प्रशासनाकडून संभाव्य अडचणीचा विचार करून शेतकºयांना शासकीय संस्थेकडे सातबारा, पेरेपत्रक, आधार क्र मांकासह शेतमालाची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या या आवाहनानुसार शेतकरी खरेदी विक्री संस्थेकडे जाऊन उडिद, मुग या शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणीही करीत आहेत; परंतु ही नोंदणी करताना शासकीय खरेदीसाठी एका हेक्टरला केवळ तीन एकर उडिद विक्रीची मूभा देण्यात आली आहे.