वाशिम : शासनाने वाशिम जिल्ह्यासाठी यंदा ४३ कोटींच्या महसुल वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. हे उद्द्ष्टि गाठण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने कसोशीचे प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यास १०२ टक्के वसुली करणे शक्य झाले असले तरी, सहापैकी तीन तालुक्यांना त्यांचे उद्दिष्ट गाठता आले नाही. उर्वरित तालुक्यांनी निर्धारित उद्दिष्टापैक्षा खूप अधिक वसुली केल्यामुळे जिल्ह्यास आपले एकूण उद्दिष्ट गाठणे शक्य झाले आहे. जिल्हाप्रशासनाकडून सोमवारी मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे. वाशिम जिह्याला सन २०१६-१७ या वर्षाकरीता शासनाकडुन ४३ कोटी ५१ रुपये महसुल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्चला अखेर जिल्ह्याने ४४ कोेटी ५२ लाख ५६ हजार रुपये महसुल वसुल करुन उद्दिष्टाच्या १०२ टक्के रक्कम वसुल केली. तथापि जिल्ह्यातील मालेगाव, मानोरा आणि रिसोड तालुक्यांना आपले उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. या तालुक्यांनी त्यांना दिलेल्या निर्धारित उद्दिष्टापैकी अनुक्रमे ५४.८४ टक्के, ८५.१४ टक्के, आणि ३७.६५ टक्के वसुली केली आहे. त्या उलट वाशिम तालुक्याने १४३.४१ टक्के, मंगरुळपीर १३२.४४ टक्के, ११२.४९ टक्के वसुली केली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याला आपले उद्दिष्ट पूर्ण करता आले आहे. वाशिम जिल्ह्याने २०१६-१७ या वषार्साठी जमीन महसुलात २० कोटी ८२ लाख २८ हजार, कोटी, करमणुक कराची १ कोटी १९ लाख, तर गौण खनिजाची वसुली २२ कोटी ७० लाख ९ हजार असा एकूण ४४ कोटी ५२ लाख ५६ हजार रुपयांचा महसुल वसुल करुन १०२.३३ टक्के उद्दिष्ट पुर्ण केले आहे. महसुल वसुलीसाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यापर्यंत सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार वर्षभर जमीन महसुल, करमणुक कर व गौण खनिजाची वसुली करण्यात आली.
वाशिम जिल्ह्यातील तीन तालुके वसुलीच्या उद्दिष्टात अपयशी !
By admin | Published: April 04, 2017 4:00 PM