शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

वाशिम जिल्ह्यात तीन हजार घरकुलांना मंजुरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:30 PM

वाशिम - रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले.

ठळक मुद्देरमाई आवास योजना अर्जासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत

वाशिम - रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले.अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घर नसलेल्या व कच्चे घर असलेल्या कुटुंबांना शासनातर्फे घरकुल बांधण्याकरीता अनुदान देण्यात आले. वाशिम जिल्ह्यासाठी चालू आर्थिक सत्रात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले. कुटुंबसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांना वेगवेगळे उद्दिष्ट दिले असून, संबंधित लाभार्थींना थेट पंचायत समितीस्तरावर १५ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पंचायत समिती स्तरावर प्राप्त अर्ज १६ ते २४ डिसेंबरपर्यंत पडताळणीकरीता ग्रामसेवकांमार्फत संबंधित ग्रामपंचायतीला पाठविण्यात येणार आहेत. या प्रस्तावाची पडताळणी संबंधित ग्रामसेवक, मिनी बीडीओ व विस्तार अधिकाºयांमार्फत केल्यानंतर २५  डिसेंबरला ग्रामपंचायतीमध्ये पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे गणेश पाटील यांनी स्पष्ट केले.लाभार्थींच्या हरकतीचे निराकरण करण्याची संधी दिली असून, कुणाच्या काही हरकती असल्यास २६ व २७ डिसेंबर दरम्यान नागरिकांना आपल्या हरकती, आक्षेप नोंदविता येणार आहेत. २८ ते ३० डिसेंबरदरम्यान   विशेष ग्रामसभेची मान्यता घेऊन ही यादी गटविकास अधिकाºयांकडे पाठविली जाणार आहे. गटविकास अधिकाºयांनी पडताळणी केल्यानंतर ५ जानेवारी २०१८ पर्यंत अंतिम यादी घरकुल निर्माण समितीकडे सादर करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.

घरकुलासंदर्भात पैशाची मागणी झाल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

घरकुलासंदर्भात पात्र लाभार्थीला कुणीही पैशाची मागणी केल्यास किंवा दिशाभूल करीत असल्यास जिल्हा परिषदेच्या ८९७५७६७७४९ या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश पाटील यांनी केले.

टॅग्स :Homeघर