शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

तीन वर्षांच्या चिमुकल्यास घरी सोडून पोटापाण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:06 PM

Washim News हनवतखेडा येथील मनोहर आणि वर्षा वाघमारे या दाम्पत्याच्या जिवनाचे हे विदारक वास्तव आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कुटूंबाचा गाडा चालावा, पोटाची खळगी भरावी म्हणून अवघ्या शंभर रुपये मजुरीसाठी मातापित्यांना तीन वर्षांच्या चिमुकल्यास दिवसभर घरी ठेवून कामाला जावे लागते. मालेगाव तालुक्यातील हनवतखेडा येथील मनोहर आणि वर्षा वाघमारे या दाम्पत्याच्या जिवनाचे हे विदारक वास्तव आहे. जिल्ह्यातील मालेगाव तालुका हा आदिवासी बहुल आहे. या तालुक्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगधंदे, तर सोडाच; पण खरीप हंगामानंतर शेतीची कामेही मिळणे कठीण असते. त्यामुळे काही महिला, पुरुष बिबे फोडण्याचे काम करून कुटूंबाचे उदरभरण करतात. त्यात हनवतखेडा येथील बहुतांश कुटूंबाचा समावेश आहे. यामध्ये मनोहर नामदेव वाघमारे आणि वर्षा मनोहर वाघमारे या पती, पत्नीचा समावेश आहे. या दाम्पत्यांना प्रतिक (३ वर्षे) आणि संघर्ष (७ महिने) अशी दोन अपत्ये आहेत. बिबे फोडण्याचे काम घातक आहे आणि दुसरा रोजगार नाही. मुलास सोबत नेल्यास त्याला बिब्याच्या उडणाऱ्या तेलापासून धोका आहे. एकाने घरी राहिले, तर पोट भरणे कठीण, अशी समस्या त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे त्यांना ३ वर्षाच्या प्रतिकला दिवसभर घरी सोडून प्रत्येकी शंभर रुपये मजुरीने बिबे फोडण्याच्या कामाला जावे लागते. तेव्हा, ३ वर्षाच्या प्रतिक संपूर्ण दिवस घराच्या बंद दरवाजासमोर बसून मातापित्याची प्रतिक्षा करीत असल्याचे विदारक चित्र हनवतखेड्यात पाहायला मिळते. 

७ महिन्यांच्या बाळासाठी झाडाला पाळणाबिबे फोडण्याचे काम करीत असताना ७ महिन्याचे बाळ वागविणे कठीण असते आणि सांभाळण्यास कोणी नसल्याने त्याला घरी सोडणेही अशक्य असते. त्यामुळे वर्षा आणि मनोहर वाघमारे, हे पती-पत्नी त्यांच्या ७ महिन्यांच्या संघर्ष नावाच्या चिमुकल्यास कामाच्या ठिकाणी असलेल्या झाडाला पाळणा बांधून झोपी घालत आपले काम करतात. 

आमच्या गावात रोजगाराची समस्या गंभीर असल्याने आम्हाला बिबे फोडण्याचे काम करावे लागते. एकट्याने भागत नाही आणि बिब्याच्या घातकतेमुळे चिमुकल्या प्रतिकला सोबत नेता येत नाही.-मनोहर वाघमारे, रहिवासी, हनवतखेडा  

टॅग्स :washimवाशिम