शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
2
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
3
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
4
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
5
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
6
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
7
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
8
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
9
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
10
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
11
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
12
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
13
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
14
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
15
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
16
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
17
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
18
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
19
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

गावकऱ्यांच्या एकजुटीतून तपोवन गाव बनले 'पाणीदार' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:29 AM

साहेबराव राठोड शेलूबाजार : वॉटरकप स्पर्धेने पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये एकजूट निर्माण केली. शासनावर अवलंबून राहण्याचा प्रघात मोडायला ...

साहेबराव राठोड

शेलूबाजार : वॉटरकप स्पर्धेने पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये एकजूट निर्माण केली. शासनावर अवलंबून राहण्याचा प्रघात मोडायला शिकवले आणि स्वकष्टाने आपल्या गावाला पाणीदार बनविण्याचा अनुभवही दिला. याच बळावर शेलूबाजार येथून जवळच असलेल्या तपोवन ग्रामवासीयांनी अंतर्गत राजकारणाला फाटा देता एकजुटीने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर मात करीत गाव पाणीदार बनविले आहे.

तपोवन हे केवळ १ हजार ६५ लोकवस्तीचे गाव. मात्र येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची असायची. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शरदराव भानुदास येवले यांची जनतेतून सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर गावातील अंतर्गत राजकारणाला फाटा देत गावाचा विकास करण्याचा निश्चय केला. २०१८-१९ मध्ये पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रमदानातून एकजूट दाखविल्याचा प्रत्यय दिला. मागील वर्षी श्रमदानातून ३ शेततळे निर्माण केले. त्यामुळे गावातील गुराढोरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली, सोबतच गावातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या ग्रामपंचायतचे बोअरवेलमध्ये आता दिवसभर पाणी पुरेल इतका जलसाठा वाढला. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या श्रमदानास ग्रामस्थांमध्ये चांगलाच उत्साह जाणवला. भारतीय जैन संघटनेकडून पोकलँड मिळाला. यासाठी जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत पोफळकर, शेलूबाजार ग्रा पं उपसरपंच रजनीश कर्नावट तसेच डॉ रिखबचंद कोठारी, मदनभाई येवले यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी २ व यावर्षी ४ असे ६ किलोमीटर नाला खोलीकरण करण्यात आले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकाराने तपोवन गाव जलसमृद्ध बनले आहे. पानी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, तालुका समन्वयक सुभाष गवई, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. गाव पाणीदार बनविण्यासाठी गावकरी, शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. गेल्या दोन वर्षांत गावातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व गावातील युवकांचे मोठे सहकार्य लाभले, असे सरपंच शरदराव भानुदास येवले यांनी सांगितले.

००

बॉक्स

कृषी विभागाचे जलसंधारणाची कामे

गेल्यावर्षी २५० हेक्टर बांध बंदिस्त डीप सीसीटीची ५६ हेक्टर कामे केली. यंदाही कृषी विभागाकडून गॅबियन बंधारे निर्माण केले. एकाचे काम पूर्ण झाले तर २ प्रगतिपथावर आहेत. २५ एलबीएस मंजूर आहेत. १ माती नालाबांध, ५ गावातील युवकांना कृषी विभागाच्या वतीने मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रशिक्षणावरून चंद्रकांत येवले यांनी आपल्या शेतात तो प्रयोग यशस्वी केला आहे. कृषी साहाय्यक वर्षा भारती यांनी तपोवन गावाला आवश्यक त्या विविध कामांचे नियोजन केले आहे.

००

बॉक्स

सामाजिक वनीकरणाचेही सहकार्य

पानी फाउंडेशनमध्ये सहभागी तपोवन ग्रामवासीयांना सामाजिक वनीकरण विभागाचेही पाठबळ मिळाले. पावसाळ्यापूर्वीचे ई-क्लास जमिनीवर २० हेक्टरमध्ये २२ हजार २२० खड्डे १० बाय १० साइजमध्ये केले आहेत. यावर्षी नियोजनानुसार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पाणी क्षेत्रात पाणी अडविण्यासाठी समतल चर खोदण्यात आले. वृक्षलागवड क्षेत्रामध्ये गुरांपासून संरक्षण मिळावे म्हणून चर खोदले आहे. सदर कामे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर चौधरी यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.