लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बंजारा समाजातील अविवाहित युवतींसाठी अत्यंत महत्वाचा असलेला तीज उत्सव जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बंजारा समाजातील संस्कृतिचे दर्शन घडून आले.जिल्ह्यातील पिंप्री अवगण (ता.मंगरूळपीर) येथे ३ सप्टेंबर रोजी बंजारा तांडा येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंबादास नाईक यांच्या निवासस्थानी देविदास नाईक आणि वामन नाईक यांच्याहस्ते पुजेचा कार्यक्रम पार पडला. तेथून तीज विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करण्यात आले. नजिकच्या गावतलावात युवतींनी तीज विसर्जीत केली. जिल्ह्यातील इतरही ठिकाणच्या बंजारा तांडा-वस्त्यांवर तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तीज उत्सवात झाले बंजारा संस्कृतिचे दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 6:07 PM
तीज उत्सव जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्दे बंजारा तांडा येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.तीज विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करण्यात आले.