लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील ४९१ ग्रामपंचायतींमधील घरपट्टी व पाणीपट्टी कराची थकीत रक्कम चार कोटी ६९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. थकीत कर वसूल करण्याच्या दृष्टीने थकबाकीदारांना ह्यअल्टीमेटमह्ण देण्यात आला.वाशिम जिल्हय़ात ४९१ ग्रामपंचायती असून, विविध प्रकारच्या कर वसुलीतून ग्रामपंचायत स्तरावर विकासात्मक कामे केली जातात. ग्रामपंचायत स्तरावर ग्राहकांकडून पाणीपट्टी व घरपट्टी वसूल केल्या जाते. सन २0१६-१७ या वर्षात ग्रामपंचायतच्या मालमत्ता व पाणीकराची १00 टक्के कर वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. तथापि, ७६ टक्केच्या आसपास कर वसुली झाली. उर्वरित २४ टक्के कर थकीत राहिला. थकीत कर वसूल करणे व चालू कराबाबत माहिती देऊन कराच्या भरणा करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या. घरपट्टीच्या करातून १२ कोटी ३0 लाख ७२ हजार रुपये वसूल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९ कोटी ३८ लाख ३४ हजार रुपये वसूल झाले असून, दोन कोटी ९२ लाख ३८ हजार रुपये थकीत राहिले आहेत.याप्रमाणेच पाणीपट्टी करातून सात कोटी ४३ लाख ४३ हजार रुपये वसूल होणे अपेक्षित असताना, पाच कोटी ६६ लाख १९ हजार रुपये वसूल झाले. उर्वरित १ कोटी ७७ लाख २४ हजार रुपये थकीत राहिले आहेत. कराची थकीत रक्कम वसूल करण्याबरोबरच चालू वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टीच्या कराबाबत सूचना दिल्या जात आहेत.सर्वात कमी घरपट्टी व पाणीपट्टी वसुली कारंजा तालुक्यातून झाली असून, याची टक्केवारी अनुक्रमे ७१ व ७0.५0 अशी आहे तसेच सर्वात जास्त पाणीपट्टी वसुली रिसोड तालुक्यातून झाली असून, याची टक्केवारी ८२.८४ अशी आहे. सर्वात जास्त घरपट्टी वसुली मालेगाव तालुक्यातून झाली असून, याची टक्केवारी ८१.५६ अशी आहे. घरपट्टी व पाणीपट्टी कराची थकीत असलेली चार कोटी ६९ लाख रुपयांबरोबरच चालू वर्षातील कराची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला जात आहे. या करांची वसूली करण्याच्या सूचना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी दिल्या.
४.६९ कोटींचा कर थकीत
By admin | Published: June 11, 2017 2:16 AM