लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी व २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, १८ सप्टेंबरपर्यंंत एकूण २.१६ लाख शेतकर्यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर यापैकी केवळ १.२५ लाख शेतकर्यांनीच अर्ज भरले. उर्वरित एक लाख शेतकर्यांना एका दिवसात ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. २२ सप्टेंबरपर्यंंंत ऑनलाइन अर्ज न भरल्यास कर्जमाफीच्या लाभापासून संबंधित शेतकर्यांना वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले, कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा सामान्य रुगणालयात ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाशिम कारागृहातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या कैद्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी कारागृहातसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. मात्र ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झालेले अनेक शेतकरी आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, १८ सप्टेंबरपर्यंंत २.१६ लाख शेतकर्यांची ऑनलाइन नोंदणी झाली होती. यापैकी एक लाख २५ हजार ८५ शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. शेवटच्या दिवशी अर्थात २२ सप्टेंबरपर्यंंंत जवळपास एक लाख शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यातच वीज भारनियमन, कनेक्टिव्हिटी नसणे, तांत्रिक अडचणी, बोटांचे ठसे न घेणे आदी अडचणी निर्माण झाल्यास काही शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकर्याला कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयांपर्यंंंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.बँकेमध्ये ऑफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्यांनीसुद्धा ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र शेतकर्याने घेतलेले पीक कर्ज कोणत्याही बँकेचे असले तरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी भरण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांंंमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या त्रुटींची दुरुस्तीही २२ सप्टेंबर २0१७ पर्यंंंतच करणे आवश्यक आहे. संबंधित शेतकर्यांनी २२ सप्टेंबरपर्यंंंत ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
मुदतवाढ देण्याची मागणीअनेक शेतकर्यांच्या बोटांचे ठसे येत नसल्याने त्यांना ऑनलाइन अर्ज भरता आले नाहीत. आधार कार्डशी बोटाचे ठसे संबंधित असल्याने तहसील कार्यालयांतून आधार कार्ड व बोटाचे ठसे ‘अपडेट’ करण्याचा सल्ला शेतकर्यांना प्रशासनातर्फे देण्यात आला होता. तथापि, अद्यापही अनेक शेतकर्यांचे आधार कार्ड व बोटाचे ठसे ‘अपडेट’ झाले नसल्याने अर्ज करण्याला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.