शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

२६१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 2:03 AM

वाशिम: जिल्हय़ातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची यंदा  निवडणूक होणार होती; मात्र १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने  आता ७ ऑक्टोबरला उर्वरित २६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक  होत असून, त्यासाठी ७९७ मतदान केंद्रे ेकार्यान्वित करण्यात  आली आहेत. या निवडणुकीत ३ लाख ३२ हजार १८५ मतदार  मतदानाचा हक्क बजावणार असून, ३0,६६ सदस्य आणि ९१२  सरपंच पदाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. 

ठळक मुद्दे७९७ मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ रवाना३ लाख ३२ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची यंदा  निवडणूक होणार होती; मात्र १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने  आता ७ ऑक्टोबरला उर्वरित २६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक  होत असून, त्यासाठी ७९७ मतदान केंद्रे ेकार्यान्वित करण्यात  आली आहेत. या निवडणुकीत ३ लाख ३२ हजार १८५ मतदार  मतदानाचा हक्क बजावणार असून, ३0,६६ सदस्य आणि ९१२  सरपंच पदाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांंचा कार्यकाळ संपत असल्याने  जिल्हय़ातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात वाशिम तालु क्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव  तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्या तील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा  समावेश होता; मात्र गावकर्‍यांनी एकोप्याचा संदेश देत आपसी  सहमतीने १२ ग्रामपंचायती अविरोध केल्या. त्यामुळे आता ७  ऑक्टोबरला प्रत्यक्ष २६१ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक होत  आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, म तदान केंद्रस्तरीय अधिकारी व विशेष पथकातील चमू  ईव्हीएमसह आपापल्या केंद्रांवर रवाना झाल्याची माहिती निवासी  उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.चोख पोलीस बंदोबस्त तैनात२६१ ग्रामपंचायतींमध्ये होत असलेल्या निवडणुकीदरम्यान  कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनही  सज्ज झाले असून, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा  येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविण्यात आली आहे.  त्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस  अधीक्षक, ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २७ पोलीस  निरीक्षक, ४५ पोलीस उपनिरीक्षक, १६ सहायक पोलीस  निरीक्षकांसह १,७00 पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी, ६00  होमगार्ड्स असा मुबलक प्रमाणातील पोलीस ताफा म तदानादरम्यान करडी नजर ठेवून राहणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली. 

जिल्हय़ातील २६१ ग्रामपंचायतींमध्ये ७ ऑक्टोबरला होऊ घा तलेल्या निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली असून,  केंद्रस्तरीय कर्मचारी व विशेष पथकास यासंबंधीचे प्रशिक्षण  देण्यात आले आहे. मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  लागू करण्यात आले असून, नियमबाहय़ वर्तन करणार्‍यांची  कुठलीच गय केली जाणार नाही. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने  घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा आणि योग्य  उमेदवाराची निवड करावी.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम