रिसोड (वाशिम) :पंचायत समिती कार्यालयातील कर्मचार्यास पंचायत समिती उपसभापतीसह काही पदाधिकार्यांनी शिवीगाळ करून असभ्य वागणूक दिल्याची घटना १९ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी कर्मचार्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊ न उद्या, २0 जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या कक्षामध्ये उपसभापती व इतर पदाधिकारी यांनी कर्मचारी एस. के. रिठे यास महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भात माहिती विचारून शिवीगाळ व असभ्य वागणूक दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर २३ कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या असून, रात्री ८ वाजताच्या दरम्यान रिसोड पोलीस स्टेशनमध्ये पंचायत समितीमधील कर्मचार्यांनी या प्रकाराची तक्रार देण्यासाठी दाखल झाले होते. निवेदनावर अधीक्षक एस. ए. खान, पी. एम. नांदे, एच.एस. महानाग, विस्तार अधिकारी व्ही.के. खिल्लारे यांच्यासह २३ कर्मचार्यांचा सहभाग आहे.
आज रिसोड पं.स.कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
By admin | Published: January 20, 2015 12:36 AM