लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २२ मे रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे.मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय सभेनंतर चालू आर्थिक सत्रातील ही पहिलीच सभा होणार असल्याने या सभेत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कोणते विषय चर्चेला येतील, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय सभेत विरोधकांसह काही सत्ताधारी सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार करून सभागृह दणाणून सोडले होते. सभागृहात एकच गोंधळ उडाल्याने, या गोंधळातच अर्थसंकल्प मंजूर झाला होता. आता चालू वर्षातील पहिली सभा २२ मे रोजी होणार असल्याने विरोधकांची नेमकी कोणती भूमिका राहणार, सत्ताधारी सदस्य विरोधकांची भूमिका बजावतील काय? सत्ताधारी नेमक्या कोणत्या विषयांना प्राधान्य देणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवतील काय? याबाबतची जिल्हा परिषदेची भूमिका सोमवारी स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात वॉटर न्यूट्रल संकल्पनेमुळे जलसंधारणाची कामे होत नसल्याबाबत सदस्य आवाज उठवतील काय? असा सवाल जनतेमधून समोर येत आहे.
जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा!
By admin | Published: May 22, 2017 1:23 AM