----------------
शौचालय बांधकामाची पाहणी
केनवड : ३१ जानेवारीपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार केनवड जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये स्वच्छता विभागाच्या चमूने शुक्रवार, शनिवारी शौचालय बांधकामांची पाहणी केली.
---------------------------जिल्हा परिषद शाळांचे निर्जंतुकीकरण
रिठद : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याने रिठद परिसरात पूर्वतयारी केली जात आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या नऊ शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात आली.
-----------------------------
सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
अनसिंग : जिल्हा परिषद गटाचे गाव असलेल्या अनसिंग येथे सरपंचपदासाठी इच्छुकांनी पॅनल प्रमुखांकडे फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. अद्याप आरक्षणाची तारीख जाहीर झाली नसल्याने प्रत्येक जण सरपंचपदासाठी बाशिंग बांधून असल्याचे दिसून येते.
----------------------------
तोंडगाव येथे आरोग्यविषयक कार्यक्रम
तोंडगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तोंडगाव येथे शनिवारी जनजागृतीपर आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यात आला. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी केले.