वाशिम: जिल्हयात संपूर्ण दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटून विद्युत केंद्रात झालेल्या तोडफोड प्रकरणी २५ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम शहरासह संपूर्ण जिल्हयामध्ये सोमवार २ जून रोजी संपूर्ण दिवसभर भारनियमन केल्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. भर उन्हाळयाच्या मध्ये दिवसभर विद्युत पुरवठा बंद करुन नागरिकांना वेठीस धरणार्या विद्युत वितरण कंपनीबाबत शहरवासीयांच्या संयमाचा बांध फुटून विद्युत केंद्रावर चौकशीसाठी गेलेल्या जमावाने प्रचंड रोष व्यक्त करीत उपकेंद्रातील कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच घटना सोमवारी रात्री उशीरा १0 वाजताज्ञच्या सुमारास घडली होती या प्रकरणी वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जमावावर सौम्य लाठीमार चा वापर केल्यामुूळे जमाव नंतर ओसरला सदर घटनेनप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशन येथे राजू वानखेडे, सचिन इढोळे, व किशोर ठाकुर, यांच्यासह २0 ते २५ लोकांविरुद्ध कलम १४३, ३५३, ४२७, भादवी व ३,४, प्रॉपर्टी डॅमेज अँक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोडफोडप्रकरणी गुन्हा!
By admin | Published: June 04, 2014 1:21 AM