शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

व्यापाऱ्यांनीही नियमाचे पालन करणे गरजेचे- जुगलकिशोर कोठारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 5:22 PM

व्यापारी मंडळाचे वाशिम जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशभरासह वाशिम जिल्ह्यातही संचारबंदी आणि  लॉकडाऊन  लागलेला आहे. यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता इतर व्यापार पूर्णत: ठप्प झाला आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा ह्यग्रीन झोनह्णमध्ये असल्याने ४ मे पासून व्यापार सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. तथापि, व्यापाऱ्यांची भुमिका काय असावी, याबाबत व्यापारी मंडळाचे वाशिम जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांच्याशी साधलेला हा संवाद... लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील व्यापाºयांचे किती नुकसान झाले?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि ह्यलॉकडाऊनह्णमुळे जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता जिल्ह्यातील इतर साहित्य विक्रीची सर्वच दुकाने गत ३८ दिवसांपासून कडेकोट बंद आहेत. यामुळे ६०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात ओढवलेल्या या आरिष्टामुळे मुख्यत: कपडा आणि सराफा व्यवसायाला जबर फटका बसला आहे. ४ मे पासून परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येईल. व्यापाºयांनी धीर धरावा.सर्व दुकाने उघडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहणार का?नजिकच्या हिंगोली, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि अकोला या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्या तुलनेत वाशिम जिल्हा सद्यातरी निरंक आहे. ही जिल्हावासीयांसाठी भुषणावह बाब असून हे चित्र असेच कायम राहण्यासाठी ४ मे पासून सर्व दुकाने उघडल्यानंतर विशेषत: व्यापाºयांनी व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास निश्चितपणे परिस्थिती नियंत्रणात राहील, असे आपणास वाटते.काय करावे लागणार?कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये, यासाठी ह्यफिजीकल डिस्टन्सिंगह्ण, मास्कचा नियमित वापर, रोखीऐवजी आॅनलाईन व्यवहार आदी बाबींकडे व्यापाºयांनी तद्वतच ग्राहकांनी लक्ष पुरवायला हवे.व्यापाºयांकडून नियमांचे पालन केले जाईल का?वाशिम जिल्ह्यातील सर्वच व्यापारी पुर्वीपासूनच नियमांचे पालन करणारे आहेत. गत ३८ दिवसांच्या ह्यलॉकडाऊनह्ण कालावधीत सर्वांनीच लाखो रुपयांचे नुकसान सहन करून आपापली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापपर्यंत टळला नसल्याने यापुढेही प्रशासन घालून देईल, त्या नियमांचे पालन जिल्ह्यातील व्यापारी निश्चितपणे करतील. दुकानांवर खरेदीसाठी येणाºया नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत