कडधान्याचे सरकारी समर्थन मूल्यापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने केंद्र सरकारने कडधान्यावर भंडारण क्षमता निती लागू केली आहे. यामुळे धान्याचे भाव घसरल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी, व्यापारीवर्ग ही अडचणीत सापडला आहे. तथापि, केंद्र सरकारने जाहीर केलेली भंडारण क्षमता निती मागे घेण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यासह ५ जुलैपासून धान्य खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे आधीच पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी शेतमाल विकता येत नसल्याने अधिकच हैराण झाला आहे.
..........................
कोट :
केंद्र सरकारने धान्य खरेदीला ‘स्टॉक लिमिट’ लावली. यामुळे भाव कमी दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा समज झालेला आहे. या मुद्यावर व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद आंदोलन पुकारल्यामुळे बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे.
मनोज इंगोले
सचिव, बाजार समिती, मानोरा