लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : १० रुपयाचे नाणे हे चलनातून बाद होत असल्याच्या अफवेमुळे व्यापारी तसेच काही ग्राहकही १० रुपयाचे नाणे स्विकारण्यास नकार देत असल्याचा प्रकार शिरपूर परिसरातून समोर येत आहे. शिरपूर परिसरातील बाजारपेठेत चिल्लर नाण्यांसह १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. दुसरीकडे गत पाच ते सहा महिन्यांपासून दोन हजार रुपयांची नोट जणू गायबच झाल्यागत दिसून येत आहे. सद्यस्थितीत व्यापाºयांकडे चिल्लर नाण्यांसह १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. चिल्लरअभावी व्यवहारात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून काही महिन्यांपूर्वी व्यापारी हे १, २ व ५ रुपयांचे नाणे हे पाच ते १० रुपये शेकडा कट्टीने घेत होते. अलिकडच्या काळात १, २, ५ व १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात चलनात आल्याने चिल्लरची टंचाई भासत नाही. याचप्रमाणे १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटाही बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसरीकडे १० रुपयांचे नाणे चलनातून बाद होणार असल्याच्या अफवेने आजही सदर नाणे स्विकारण्यास व्यापाºयांप्रमाणेच काही ग्राहकही तयार नसल्याचे दिसून येते. १० रुपयाच्या नाण्यांवरून परिसरात बºयाच वेळा ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही घडते. १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद होणार असल्याची केवळ अफवा असल्याने व्यापारी तसेच ग्राहकांनीदेखील १० रुपयांचे नाणे स्विकारावे, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
१० रुपयाचे नाणे स्विकारण्यास व्यापाऱ्यांची नकारघंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 2:11 PM