धनज बु. : कोरोनामुळे यंदाही शेतकरी अडचणीत असून, कडक निर्बंध लागू असल्याने बाजारपेठ बंद आहे. परिणामी, टरबूज खरेदी करण्याकडे व्यापाºयांनी पाठ फिरविल्याने याचा फटका धनज बु. परिसरातील शेतकºयांना बसत आहे.उन्हाळ्यात थंड व शरीरास पोषक असणार फळ म्हणून टरबुजची ओळख आहे. धनज ब. परिसरात शेतकऱ्यांकडून या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला यावर्षी टरबूजला चांगला भाव मिळाला. जिल्ह्यातील टरबुजाला कोलकत्ता, दिल्ली बाजरापेठेत मागणी वाढल्याने बारा रुपये प्रतिकिलो एवढ्या उचांकी दर मिळाले. परंतु १५ एप्रिलनंतर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे टरबुजाचे दर बारा रुपये प्रतिकिलो वरून चार रुपये प्रतिकिलो एवढी घसरले. त्यामुळे मोठ्या आशेने टरबूज पीक घेणाऱ्या शेतकऱयांची निराशा होऊन आर्थिक नुकसान होत आहे. सद्या बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दोन एकर शेतामध्ये टरबूज पिकाची लागवड केली आहे. सुरुवातीला टरबूज पिकाला चांगले भाव होते. परंतु कडक निर्बंधामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने टरबूज पिकाला लावलेला खर्च देखील निघणे कठीण आहे.- बाळू हेरोडे, शेतकरी