शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

  गुरुमंदिर संस्थानची अन्नदानाची परंपरा कायम - प्रकाश घुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 5:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेतल्या जात आहे. परंतु कारोनाच्या पार्श्वभूमिवर गुरुमंदिर संस्थानच्यावतिने दररोज करण्यात येत असलेल्या शेकडो भाविकांना अन्नदान ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली असून भाविकांऐवजी गरजु ३०० लोकांना अन्नदान केल्या जात असल्याचे श्री नृसिंह सरस्वती महाराज (गुरुमंदिर) मंदिराचे विश्वस्त प्रकाश घुडे यांनी मंगळवारी घेतलेल्या मुलाखतीदरमयान सांगितले.

कोराना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संस्थानचे योगदान?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर ३०० लोकांना दररोज अन्नदान केल्या जात आहे. संस्थानच्यावतिने शेकडो भाविकांसाठी अन्न शिजविल्या जात होते. परंतु संचारबंदी काळात मंदिरात गर्दी होऊनये याकरिता दर्शन बंद केल्याने भाविकांची गर्दी कमी झाली. दररोज बनविण्यात येत असलेले अन्न अविरत तयार करण्यात येत असून ते गरजुंना पाकीट तयार करुन जागेवर वाटप केल्या जात आहे.

शासनाच्या मदतीच्या आवाहनाबाबत काय सांगाल?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संपूर्ण देश संकटात आला आहे यात दुमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुमंदिर संस्थानच्यावतिने २१ लाख रुपयांची देणगी शासनाला देण्यात आली आहे.

भाविक दर्शनाकरिता मंदिरात येतात का?जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. परिसरातील काही भाविक दर्शन मंदिरात प्रवेश न करतात बाहेरुन घेतांना दिसून येतात. परंतु प्रशासनाच्या आवाहनानुसार मंदिर केवळ  गुरुंच्या पुजेपुरतेच सद्यस्थितीत आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

 कोरानाच्या पृष्ठभूमिवर संस्थानच्यावतिने काय सांगाल?देशात आलेले संकट पूर्णपणे नष्ट व्हावे याकरिता दररोज गुरु महाराजांकडे प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच हि परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संस्थान शासनाच्या सोबत राहून सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे.

भाविकांना काय मार्गदर्शन करणार?देशात आलेले कोरोनाच्या संकटात कोणीही घराच्याबाहेर जाऊ नका, देवाची घरात पूजाअर्चा करा. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आहोत. हे संकट टळल्यानंतर सर्व सुरुळीत होईल यात दुमत नसल्याने संकट टळेपर्यंत घरातच रहा. 

टॅग्स :Karanjaकारंजा