लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरामध्ये भर रस्त्यांवर आॅटो, जड वाहने उभे राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान अतिशय रहदारीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. शहर वाहतूक शाखेच्यावतीेने दररोज शेकडो मोटारसायकलस्वारांवर विविध कारणांवरुन कारवाईची मोहीम राबविण्यात येत असतांना फेरीवाल्यांना आॅटोधारकांनाच का सूट असा प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यात आॅटो उभे राहत असल्याने वाहनधारकांना, पादचाºयांना पायी चालणे कठीण झाले आहे. शहर वाहतूक शाखेने अश्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. प्रवाशांना , पादचाºयांना व वाहनधारकांना शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका, बसस्थानकचौक विशेषत: शहरातील सर्वात गजबजलेला पाटणी चौक मध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतो. पाटणी चौकामधील दररोजची गर्दी पाहता चौकात तर फेरीवाले , आॅटोवाले किंवा कोणालाही चौकात उभे राहण्याची परवानगी नसावी, आधिच चौक लहान त्यात गर्दीचा सर्वसामान्यांना रोजच त्रास सहन करावा लागतो. त्यात दोन्ही बाजुला आॅटोधारक आपली वाहने उभी करुन वाहतूक विस्कळीत करण्यात हातभार लावतांना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे येथे उभे राहणाºया आॅटोमध्ये अनेक आॅटो खासगी आहेत. ज्यांना केवळ आपल्या सोयीसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ती आॅटो तेथून बसस्थानक व प्रवासी म्हणेल तेथे नेण्याचे काम करीत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे ठरविण्यात आलेले नाही. अव्वाच्या सव्वा भाडे सांगून जनतेची लूट केल्या जात आहे. पर्याय नसल्याने नागरिकांना , प्रवाशांना खिशाला कात्री लागत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी विशेष लक्ष देवून शहर वाहतूक शााखेला कडक आदेश करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. बॉक्स--रस्ता ‘डिव्हायडर’ ठरले अडचणीचे!वाशिम शहरातील पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याचे काम नुकतेच झाले. यावेळी रस्त्याच्या मधोमध ‘डिव्हायडर’ नागरिकांच्या सोयीसाठी व आपल्या दिशेने वाहनधारकांनी चालावे यासाठी उभारण्यात आलेत. परंतु हेच डिव्हायडर सोयी कमी नुकसानदायकच जास्त ठरत आहेत. या डिव्हायडरच्या दोन्ही बाजुला लघुव्यावसायिक, फेरीवाले चक्क आपली दुकाने थाटून आधिच अरुंद रस्ता अधिक अरुंद करतांना दिसत आहेत.४ वाशिम शहरात अनेक चौकांमध्ये परमिट नसलेले आॅटो बिनधास्तपणे कुठेही उभे राहत आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी हजर असतांना त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. प्रवासी वाहतुकीचे परमिट नसतांना अनेक वाहने आज शहरातून धावत आहेत.४ वाशिम येथील सर्वात गजबजलेल्या पाटणी चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी हजर असतात. त्यांच्यासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात परंतु यांना कोणीही हटकतांना दिसून येत नाही. अधिकारीवर्ग आला की, केवळ ‘शो’ केला जात आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जात आहे. शिवाजी चौकातील गर्दी पाहता दररोज वाहतूक प्रभावित करणाºयांवर कारवाई केली जाते. रस्त्यावर व्यवसाय थाटणाºयांना सूचना करुन कर्मचाºयांना कारवाई करण्याचे सांगण्यात येईल. वाहनधारकांनी आपली वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आवाहन करण्यात येईल.-विनायक जाधववाहतूक निरिक्षक, शहर वाहतूक शाख वाशिम
रस्त्यावरील आॅटो, फेरीवाल्यांमुळे वाहतूक प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:19 PM