नुकसानभरपाई देण्याची मागणी
वाशिम : जऊळका रेल्वे गाव परिसरात १९ ते २१ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे विशेषत: कांदा, फळपिके व भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने विनाविलंब सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
किन्हीराजा येथे कारवाई
वाशिम : किन्हीराजा-मालेगाव मार्गावर पोलिसांनी बुधवारी नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक व तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. नियम पाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
लोंबकळलेल्या वीज तारांमुळे वाढला धोका
मालेगाव : शिरपूर येथील बसथांबा परिसरातील विद्युत तारा मागील अनेक वर्षांपासून लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. ही बाब धोकादायक ठरत असून, महावितरणने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे. बसथांबा परिसरात रस्त्याची उंची वाढल्याने वीज तारांचे अंतर जमिनीपासून कमी झाले आहे.
पोहरादेवीत कोरोना लसीकरण जनजागृती
वाशिम : मानोरा तालुक्यातील मोहरादेवी परिसरातील मनभा आरोग्य केंद्रांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून बुधवारी जनजागृतीला सुरुवात करण्यात आली.
विलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष
कामरगाव : गेल्या काही दिवसांत कामरगावात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यात गत तीन दिवसांत आणखी पाच व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून, ग्राम समिती त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
गावकरी घेताहेत पावसाची नोंद
वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी झालेल्या ४३ गावांत स्पर्धेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जलसंधारणासह विविध पाणलोट आणि इतर कामे करतानाच या गावात पर्जन्यमानाची नोंद गावकरी घेत आहेत.
महामार्गालगत अतिक्रमण
वाशिम : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्णत्वास येत असताना आता या महामार्गालगतच काही मंडळी अतिक्रमण करीत आहेत.