.............
लोककल्याणकारी योजनांची जनजागृती
जऊळका रेल्वे : जिल्हा माहिती कार्यालय व सूर्यलक्ष्मी शिक्षण, बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेत परिसरातील गावांमध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती केली.
.............
वित्तीय साक्षरेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन
पोहरादेवी : क्रिसील फाऊंडेशनतर्फे वित्तीय साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. याअंतर्गत मानोरा वित्तीय साक्षरता केंद्राकडून पोहरादेवी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
..........
शेलूमार्गे वाहतुकीत वाढ
शेलूबाजार : वाशिम ते अकाेला शेलूमार्गे रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरून माेठया प्रमाणात वाहतुकीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मालेगावमार्गे रस्ता नादुरुस्त आहे.
...........
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
वाशिम : प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांनी प्रमुख मार्गावर काही महिन्यांपासून हैदोस घातला आहे.