या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी अंगणवाडी सेविका यांनी माता व बालकांचे उत्तम पोषण व्हावे यासाठी त्यांनी स्वतः याविषयी जागरूक असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस. एन. लुंगे यांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या तंत्रज्ञानातून प्रत्येक अंगणवाडीला शासनाकडून मिळालेल्या पोषण परस बाग किटचा वापर आपल्या गावामध्ये तंत्रशुद्ध सामाजिक पोषण परस बाग तयार करण्यासाठी करावा, अशा मार्गदर्शक सूचना केल्या. कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी पोषण परस बागेचे महत्त्व पटवून देताना अंगणवाडीमध्ये सामाजिक पोषण परस बाग तयार केली तर मुलांची थेट निसर्गाशी जवळीक वाढते. सोबत त्यांना सुदृढ आरोग्यासाठी आहारातील भाज्या व फळे याचे महत्त्व पटवून देता येईल, असे सांगितले.
अंगणवाडी सेविकांना पोषण परस बाग विषयावर प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:46 AM