कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी सर्वप्रथम संत्रा बागांची परिस्थिती जाणून घेऊन बागांच्या निरीक्षणाच्या आधारे मार्गदर्शन केले. यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, संजीवकांचा वापर, ओलीत व्यवस्थापन, नवीन लागवड व कीड व रोग व्यवस्थापन इत्यादीविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. सोबतच संत्रा या बहुवर्षीय पिकाच्या उत्कृष्ट बागा निर्माण करण्यासाठी बागाईतदारांनी आपल्या अनुभवांची देवाण-घेवाण करणे अत्यंत महत्त्वाचे असून त्या दृष्टीने गट शेती संकल्पाची माहिती देऊन गट शेती सुरू करण्याचे आवाहन केले.
------
शेतकऱ्यांचे शंका समाधान
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान तज्ज्ञांच्या वतीने करण्यात आले. यशस्वितेसाठी राजकुमार देव्हडे, कैलाश देव्हडे, अजय दांदळे, ठाकरे, वामन जाधव, तसेच गावातील बहुसंख्य संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजकुमार देव्हडे यांनी केले.