शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक जुन्या पुलावरून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 3:57 PM

शुक्रवारच्या जोरदार पावसाने खरडून गेल्याने अकोला-मंगरुळपीर मुख्य मार्ग बंद पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चिखली येथून जाणाºया मार्गावरील जुन्या पुलावरून सुरू आहे.

- साहेबराव राठोड शेलुबाजार (वाशिम) : राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने शेलुबाजार येथील अडाण नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे केलेला वळणमार्ग शुक्रवारच्या जोरदार पावसाने खरडून गेल्याने अकोला-मंगरुळपीर मुख्य मार्ग बंद पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चिखली येथून जाणाºया मार्गावरील जुन्या पुलावरून सुरू आहे. आधीच हा पुल कमी उंचीचा आणि जुना आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतुक होणे, ही धोक्याची बाब ठरू शकते. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने अकोला ते मंगरुळपीर आणि यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीदरम्यान एनएच १६१ ए या महामार्गाचे काम गेल्या सात महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. यात शेलुबाजार ते मंगरुळपीर या मार्गाचे काम करताना ऐन पावसाळ्यापूर्वी कंत्राटदाराने पुलाची कामे सुरू केली. त्यात हिसई येथील मडाण नदी, शेलुबाजार येथील अडाण नदी, तसेच इतर दोन, चार नाल्यांवरील पुलांचा समावेश आहे. हिसई येथील पुलाचे काम पूर्ण झाले, तर अडाण नदीवर शेलुबाजारनजिकच्या पुलाचे काम अर्धवटच आहे. या पुलाच्या कामामुळे मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वळणमार्ग तयार करण्यात आला; परंतु हा वळण मार्ग तयार करताना संभाव्य पूर परिस्थितीत पाणी वाहून जाण्यासाठी पाईप लावण्यात आले नव्हते. अशातच शुक्रवारी शेलुबाजार परिसरात धो-धो पाऊस पडल्याने अडाण नदीला पूर आला आणि या पुरात निर्माणाधीन पुलासाठी लावलेल्या सेंट्रिंगसह वळणमार्गही पुरात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आता ही वाहतूक नजिकच्याच चिखली येथून जाणाºया मार्गावरून सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर एक जुना आणि अरुंद पुल असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होणे ही धोक्याची बाब ठरू शकते.  वाहतूक रात्रभर होती ठप्पअडाण नदीला आलेल्या पुरामुळे निर्माणाधीन पुलानजिकचा मार्ग वाहून गेला, पुलाच्या कामासाठी लावलेले सेंट्रिंगही वाहून गेले आणि नदी दुथडी भरून वाहू लागल्याने अकोला-मंगरुळपीर दरम्यानची या पुलावरील वाहतूक  शुक्रवारी सायंकाळपासून बंद पडली. ही वाहतूक रात्रभर बंद होती. शनिवारी सकाळी ही वाहतूक सुरू झाली आणि तीसुद्धा चिखली-शेलुमार्गावरील जुन्या पुलावरून. कंत्राटदाराने वेळीच दखल न घेतल्याने हा प्रकार घडला असून, याचा फटका प्रवासी, वाहनधारकांसह सर्वसाधारण जनमतेला सहन करावा लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर