शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जनावरांची निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक; कायद्याची पायमल्ली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 3:45 PM

वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देपशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे. मात्र, कायदा होऊन ५८ वर्षे होऊनही आजही जनावरांची चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उजागर झाला.प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यान्वये पशूंची वाहतूक करताना पशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. पशूंच्या वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. पशूंची वाहतूक करताना वाहनात पशूंच्या उपचारासाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. पशूंना वाहनात चढविणे आणि उतरविण्यासाठी योग्य आकाराच्या फलाटांची सोय असावी, पशूंना वाहतुकीदरम्यान बसण्यासाठी किमान ५ सेंटीमीटर मऊ गवताचे तळ असायला हवे, पशूंची वाहतूक करणारे वाहन पुरेसे तथा मोठ्या आकाराचे असावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत; परंतु यातील एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले. विनापरवाना चालते जनावरांची वाहतूक!वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ९६ अन्वये पशूधनाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधित जनावर सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाºयांचे स्वास्थ तपाासणी प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे. पशूंची वाहतूक करताना नियमानुसार तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडून विहित परवाना घेणेही बंधनकारक आहे. मात्र, वाशिममधील गुरांच्या बाजारातून होणाºया जनावरांच्या वाहतूकीदरम्यान बहुतांश वाहनधारकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. याकडे संबंधित त्या-त्या यंत्रणांनी लक्ष पुरविणे आवश्यक ठरत आहे. प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा १९६० मधील तरतुदीनुसारच जनावरांची वाहतूक व्हायला हवी. यासंदर्भात तपासणी मोहिम राबवून चुकीच्या पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाºयांविरूद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल.- जयश्री दुतोंडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार