मंगरुळपीर (जि. वाशिम) : शहरातील अनेक चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना चौकामधून येजा करणे कठीण होत असल्याचे दिसून येत आहे.शहरामध्ये बसस्थानक परिसर ,अकोला चौक, मानोरा चौक, दास्यमुक्ती चौक, बिरबलनाथ चौक, महात्मा फुले, चौकामध्ये वर्दळीचे ठिकाण असून नागरिकांना या चौकातून नेहमीच येजा करावी लागते. मात्र या चौकामध्ये वाहतुक व्यक्त विस्कळीत होत असल्यामुळे चौकामधून वयोवृध्द नागरिक, महिला व शाळकरी मुलांना मार्ग काढत असतांना तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडून भांडणे, वादविवाद होण्याचे प्रकारही नित्याचीच बाब आहे. यामध्ये चारचाकी वाहन धारक आपली वाहने जाणिव पुर्वक रस्त्याच्या मधोमध उभी करतात. त्यामुळे वाहतुक विस्कळीत होवून खोळंबा निर्माण होतो. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येतात मात्र याकडे डोळेझाक केली जात असल्याने वाहतुक समस्या दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मंगरुळपीर शहरात वाहतुकीची कोंडी
By admin | Published: July 02, 2016 12:02 AM