लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरांमध्ये भर रस्त्यावर आॅटो, जड वाहने उभी करुन वाहतूक प्रभावित होत असल्यासंदर्भात लोकमतने १३ व १५ एप्रिल रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची वाशिम शहर वाहतूक शाखेच्यावतिने दखल घेवून १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच रस्त्यावर उभ्या राहणााºया वाहनांना, फेरीवाल्यांना हटविण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे. पोलिसांचा ताफा घेवून सदर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई नियमित ठेवण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिल रोजी सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेच्यावतिने ही कारवाई करण्यात आली असली तरी, येथे पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने रस्तयावर पुन्हा वाहने उभी राहणार नाही याबाबत वाहतूक शाखेने दक्षता घेण्याची मागणी नागरिकांच्यावतिने केल्या जात आहे. शहरामध्ये भर रस्त्यांवर आॅटो, जड वाहने उभे राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान अतिशय रहदारीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत असल्यासंदर्भात सविस्तर वृतांकन लोकमतच्यावतिने करण्यात आले होते. रस्त्यावर वाहने उभी करण्याचा प्रकार शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी होत असल्याने प्रवाशांना , पादचाºयांना व वाहनधारकांना शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका, बसस्थानकचौक विशेषत: शहरातील सर्वात गजबजलेला पाटणी चौक मध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही येथे असे प्रकार घडले आहेत. त्यावेळी शहर वाहतूक शाखेने कारवाईही केली आहे. परंतु कारवाईनंतर काही तासातच परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याने शहर वाहतूक शाखेचा पाहिजे त्या प्रमाणात दबदबा दिसून येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. काही महिन्याआधी शहरामध्ये वाहतूक विस्कळीत होवू नये याकरिता पार्कींग व्यवस्था करण्यात आली होती. परंतु व्यापारी व पार्कींग संचालकांमध्ये वाद निर्माण झाल्याने ती संपुष्टात आली. त्यानंतर व्यापाºयांनी पुढाकार घेतल्याने आजच्या घडीला दुचाकी नागरिक व्यवस्थित वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा लावतांना दिसून येत आहे. असे असले तरी रस्त्यावर आॅटोधारक, लघुव्यावसायिक , फेरीवाले बिनधास्तपणे आपला व्यवसाय थाटत आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. १६ एप्रिलला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर वाहने, फेरीवाले दिसून न आल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला. नियमितता आवश्यक!रस्त्यावर उभी राहत असलेल्या वाहनांवर कारवाई नियमित होत नसल्याने एक ते दोन दिवसात परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही मोहीम नियमित ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. याकरिता शहर वाहतूक शाखेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
वाहतूक प्रभावित करणारी वाहने, फेरीवाल्यांना हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 3:38 PM