वाशिममार्गे पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, सोलापूर, बुलडाणा आदी मोठ्या शहरांमध्ये जाणाऱ्या ट्रॅव्हल्स धावतात. कोरोना काळात सर्वच ट्रॅव्हल्स बंद होत्या. यामुळे मालकांसोबतच चालक आणि ट्रॅव्हल्स व्यवसायावर विसंबून असलेल्या इतर कामगारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
..............
या मार्गावर धावतात सर्वाधिक ट्रॅव्हल्स
मुंबई-पुणे
लातूर-कोल्हापूर
नागपूर-नांदेड
सोलापूर-नागपूर
.....................
भाडे वाढले
पुणे-मुंबई - ९००, ११००
नागपूर-नांदेड - ८५०, ९५०
सोलापूर-नागपूर - १२००, १४००
बुलडाणा-नागपूर - ७००, ७५०
लातूर-कोल्हापूर - ९००, ९५०
................
दोन वर्षांनंतर बरे दिवस
कोरोना संकट काळात शासनाने ट्रॅव्हल्सचा व्यवसायही बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या काळात रोजगार हिरावला गेला होता. परिणामी, कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली होती. आता दोन वर्षानंतर बरे दिवस आले आहेत.
- शेख मोबिन, ट्रॅव्हल्स चालक
............
कोरोनानंतर ट्रॅव्हल्स पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा फारसा कल नव्हता. गणेशोत्सवामुळे मात्र काही प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढत आहे. रोजगारावर ओढवलेले संकटही आता दूर झाले आहे. व्यवसाय पूर्वपदावर आल्याने दिलासा मिळाला.
- मो. मोहसिन, ट्रॅव्हल्स चालक
............
प्रवाशांच्या खिशाला झळ
लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी आजही ट्रॅव्हल्सलाच पसंती दिली जाते. भाडेवाढ करण्यात आल्यामुळे मात्र खिशाला अधिकची झळ लागत आहे.
- अतुल कुटे, प्रवाशी
............
गणेशोत्सवात दुरवरच्या श्री गणेश संस्थानमध्ये दर्शनासाठी जायचा बेत आखला. त्यासाठी ट्रॅव्हल्सला पसंती दर्शविली; मात्र भाडेवाढीमुळे काहीशी नाराजी झाली.
- सुमित शिंदे