सोहमनाथ महाराज देवस्थान जागृत असल्यामुळे वाशीम जिल्ह्याव्यतिरिक्त इतरही जिल्ह्यातील भाविक भक्तांचा राबता या देवस्थानाला दर दिवशी असतो. देवस्थान परिसरामध्ये अनेक वर्षांची जुनी वड, पिंपळ, लिंबाची झाडे असून या झाडांच्या शीतल छायेत भाविक विश्रांती घेत असतात. आसोला या गावाच्या पर्यावरण संतुलनामध्ये या झाडांचे विशेष महत्त्व असून गावातील आणि परगावातून येणाऱ्या भाविकांना प्राणवायू मिळण्यासाठी या झाडांचे मोलाचे योगदान असतानाही या झाडांची कत्तल करण्यात आली आहे व राहिलेल्या झाडांचीही कत्तल सुरू आहे. झाडे लावा, झाडे जगवा यासाठी शासन आणि खासगी स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असतानाही गावाच्या मध्यभागी असलेल्या या डेरेदार वृक्षाच्या कटाईला वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाची मूकसंमती तर नाही ना, असा आरोप गावकऱ्यांनी केला. वृक्ष तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
आसोला परिसरात वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:44 AM