लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील वनशेती उप अभियानाला अमरावती विभागात शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अंतर्गत विभागातील पाच जिल्ह्यात मिळून निर्धारित उद्दिष्टानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत ९६.४३ हेक्टर क्षेत्रावर वनवृक्ष व फळझाडांची लागवड शेतकºयांनी केली आहे. या योजनेसाठी विभागात २.७५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीही करण्यात आली आहे.वातावरणातील बदलांमुळे शेती क्षेत्रातील दुष्परिणाम कमी व्हावेत आणि शेतकरी खुशाल व्हावा यासाठी केंद्र शासनाने वनशेती विषयक धोरण २०१४ मध्येच लागू केले होते. शेतीपूरक वृक्षलागवडीचा क्षेत्र विस्तार हा या अभियानामागचा केंद्र शासनाच्या मुख्य उद्देश आहे. या योजनेचा व्यापक प्रसार करून शेतकºयांचा कल याकडे वळविण्याच्या सुचना कृषी विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांना देण्यात आल्या होत्या. या योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय रोपवाटिकेतून वनवृक्ष व फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या वृक्षांची निर्धारित उद्दिष्टानुसार शेतीचे परिघीय क्षेत्र व बांधाचा अधिकाधिक उपयोग करून वृक्ष लागवड केलेल्या शेतकºयांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत वृक्ष लागवडीसाठी झालेल्या खर्चापैकी ५० टक्के अनुदान मिळणार असून, सदर अनुदान शेतकºयांना चार वर्षात चार टप्प्यात देण्यात येणार आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक असले तरी, कृषी विभागाकडून निर्धारित क्षेत्राच्या मर्यादेतील प्रत्येकी १०० रोपांची लागवड ३१ आॅक्टोबरपर्यंत केलेल्या लाभार्र्थी शेतकºयांनाच अनुदान देय असणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागात निर्धारित ९६.४३ हेक्टर क्षेत्रातील वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांचा वनशेतीकडे कल वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानातंर्गतजिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टानुसार शेतकºयांनी वृक्ष लागवड केली असून, योजनेचा कालावधी संपला आहे.-शीतल नागरेकृषी अधिकारी(शासकीय रोपवाटिका मंगरुळपीर)