वाशीम:भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात . नेमका हाच संदेश वापरून एस एम सी इंग्लिश स्कूलच्या निसर्ग इकोक्लबच्या विद्यार्थींनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली .प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी तसेच शाळेतील शिक्षिका प्रियंका भुते यांच्या मार्गदर्शनात हा आगळा वेगळा उपक्रम राबवुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला . सर्वत्र होणार्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला परिणामी ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न जागतिक समस्या बनली .यावर उपाय म्हणुन वृक्ष लागवडी सोबतच वृक्षसंवर्धनाची गरज ओळखुन राष्ट्रीय हरितसेना एस एम सी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी वृक्ष रक्षाबंधनाचा हा सण मागील अनेक वर्षापासून साजरा करतात त्यानुसार राखी पौर्णिमे निमीत्त परिसरातील वृक्षांना वृक्षरक्षा बंधन करण्यात आले . सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षीततेची खात्री करून व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा निसर्ग ईकोक्लबच्या चीमुकल्यांनी यावेळी व्यक्त केला .वृक्ष रक्षाबंधनासाठी विद्यार्थींनी पर्यावरणाला हानीकारक असणार्यां घटकांना वगळुन स्वत:च्या हाताने तयार केलेल्या राख्यांचा वापर करुन वृक्ष रक्षाबंधन केले .या प्रसंगी निसर्ग ईकोक्लबचे विद्यार्थी सृष्टि गायकवाड खुशी चौधरी , अनुष्का जैस्वाल ,दिशा अग्रवाल , जान्हवी वानरे , आरती वाझुळकर , नम्रता इंगळे , निकिता घोडके , सुरज वाझूळकर ,पिया सरवदे , प्राजक्ता वानखडे , तनुजा भिसे , दिशा दायमा , नमन कोवे , नेहा वानखेडे , रिझा हुसेन , पोर्णिमा डोंगरे , झुबिया मिर्झा , कबीर सरवदे , साहिल राऊत , निनाद अढाव ,समीर शहा तसेच सामाजिक वनीकरण विभाग वाशीमचे सहाय्यक वनसंरक्षक यु.म.फड यांचे मोलाचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.
वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 4:13 PM