वाशिम - रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची विविध प्रकारे कत्तल केली जाते. विशेषत: उन्हाळ्यात आग लावणे, साल काढून झाड वाळविणे आदी क्लृप्त्यांचा वापर करून वृक्षतोड केली जाते. दरवर्षी सामाजिक वनीकरण व इतर विभागाच्यावतीने मोठा गाजावाजा करून वाशिम जिल्ह्यात लाखो रुपयांचे वृक्षारोपण करण्यात येते. मात्र, तरीदेखील जतन केलेल्या वृक्षांची संख्या नगण्यच असल्याचे वास्तव आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी, नैसर्गिक सौंदर्य अधिकाधिक खुलविण्यासाठी सर्वत्रच वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्ष पेटविल्या जात असतांना याकडे वनविभागाचे दुर्लक्ष दिसून येते. धुऱ्यावरील केरकचरा जाळतांना कितीतरी वृक्ष जळून खाक होत आहेत परंतु संबधितांना याचे काही देणे घेणे दिसून येत नाही.
वृक्षांना आग लावून दिल्या जातेय पेटून!
By admin | Published: April 02, 2017 4:30 PM