वाशिम : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबाबत वाशिम जिल्ह्यातही शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. वाशिम, रिसोड, मालेगावसह जिल्ह्यात व्या पार्यांनी स्वयंस्फुर्तीने बाजारपेठ बंद ठेवून मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. वाशिम : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तसेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानिमित्त आज दि.४ स्वंयस्फुर्तीने बाजारपेठ बंद ठेवून वाशिमकरांनी मुंडे यांना श्रद्धांजली दिली. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अचानकपणे झालेल्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली. या अप्रीय घटनेचे पडसाद वाशिम शहरात उमटले. संपूर्ण शहरवासीयांनी स्वयंस्फुर्तीने बाजारपेठ बंद ठेवून मुंडे यांना श्रद्धांजली दिली व आपल्या प्रीय लोकनेते व लोकनायकास अभिवादन केले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज दि.४ रोजी सकाळी संपूर्ण शहरात फेरफटका मारुन मुंडे यांच्या अंत्यसंस्कार निमित्त बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे शहरातील व्यापारी मंडळीसह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी तसेच मुंडेच्या चाह त्यांनी आपला कारभार बंद ठेवून स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. या प्रसंगी शहरातील पाटणी चौक, रिसोड नाका, पुसद नाका, अकोला नाका आदी प्रमुख चौकासह संपूर्ण शहरातील दुकाने व प्रतिष्ठान बंद होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वाशिम जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली
By admin | Published: June 05, 2014 1:12 AM