यावेळी मान्यवरांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करताना शोक अनावर झाला. डाहाके यांच्या जाण्याने मोठी हानी झाली, असे मत व्यक्त करण्यात आले. कारंजा येथील पर्यटन स्थळाला प्रकाश डहाके यांचे नाव द्या, अशी मागणी सहकार नेते सुरेश गावंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांकडून झाली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवी पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इप्तेखार पटेल, माजी जि. प .सदस्य तथा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संचालक उमेश ठाकरे , बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने, माजी सभापती अशोकराव देशमुख, माजी जि. प स. भाऊ नाईक, डॉ श्याम जाधव, माजी सभापती संजय रोठे, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष डॉ. रामराव राठोड, काँग्रेसचे जि उपाध्यक्ष प्रकाश राठोड , प.स. सदस्य अभिषेक चव्हाण, मा. प. सदस्य प्रवीण धोटे रमेश नागापुरे, बाजार समितीचे संचालक सुनील, राठोड , कपिल राठोड, शिवसेना शहर प्रमुख राजू देशमुख, आदींची उपस्थिती होती.
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून प्रकाश डहाके यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:41 AM