मानोरा- दिग्रस या २२ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम महामारीमुळे लांबल्याचा दुष्परिणाम ह्या निर्माणाधीन महामार्गावरील असंख्य शेतकऱ्यांना धुळीच्या लोटामुळे पीक नुकसान आणि पावसाळ्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या नाल्या नसल्याने पाणी शेतात घुसत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
महामार्गनिर्मिती दरम्यान पंचाळा फाट्यावरुन सोयजना, चिखली, देऊरवाडी,गलमगाव ह्या रस्त्याने दिग्रस- मानोरा दरम्यानची वाहतूक वळविण्यात आल्याने काही महिन्यातच अवजड आणि प्रवासी वाहतुकीमुळे या रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे. गलमगाव येथील या रस्त्यावरील पूल मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. गादेगाव, धानोरा, सोयजना चिखली येथील नागरिकांना मानोरा येथे यावयाचे असल्यास माहुली येथून उलट फेऱ्याने जाण्याशिवाय सध्यातरी या नादुरुस्त रस्त्यामुळे पर्याय उपलब्ध नाही.