जउळकारेल्वे, दि. १२- नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील जउळका रेल्वे ते किन्हीराजा दरम्यानच्या वरदरी बु फाट्याजवळ दसर्याच्या दिवशी पहाटे ५ वाजतादरम्यान दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण् ागंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला अकोला येथे उपचारासाठी पाठविले आहे.११ ऑक्टोबरच्या सकाळी पुणे येथून रायपूरकडे एफझेड ७७६३ क्रमांकाचा ट्रक जात होत तर नागपूर येथून मुंबईकडे एमएच ४0 जी ९९४१ क्रमाकांचा ट्रक हल्दीरामचे साहित्य घेउन जात होता. जउळका रेल्वे येथून नजीक असलेल्या वरदरी बु फाटयावर या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे अपघात झाला. यामध्ये पूणे-रायपूर ट्रकचा वाहक कैलास रनसिंग रा.राजगाव गणपती (३६) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. पुढील तपास जउळका रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार आर.जी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जउळका बिटचे जमादार विलास ताजने करीत आहेत. औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील वरदरी बु. फाटयाजवळ अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे अलिकडच्या घटनांवरून दिसून येते.
ट्रकची समोरासमोर धडक; एक जण गंभीर
By admin | Published: October 13, 2016 1:55 AM