शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या केनवड येथे ट्रक (क्र. एमएच ४३ बीपी ५६९१) हा चालकाच्या निष्काळजीपणाने भरधाव वेगात रस्त्यावर आडवा होऊन उलटला. या घटनेत ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत मेहकर व मालेगावच्या दिशेने अडीच ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळावर शिरपूर पोलिसांच्या वतीने पोहेका जनार्दन शेवाळे, प्रकाश सरनाईक, विनोद चव्हाण पोहोचले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उलटलेला ट्रक हटविणे गरजेचे होते. त्यासाठी क्रेन उपलब्ध करण्याचे प्रयत्न करीत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतही रस्त्यावरील ट्रक हटविण्यात आला नव्हता. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. दुपारनंतर वाहतूक पूर्ववत झाली.
...
बॉक्स
रस्त्याच्या बाजूचे काम अपूर्ण
कोट्यवधी रुपये खर्च करून या मार्गाचे नुकतेच काम करण्यात आले. रस्ता गुळगुळीत झाला. परंतु काम करताना रस्त्याच्या बाजूच्या कडा भरण्यात आल्या नाही. परिणामतः चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या कडा भरणे गरजेचे झाले आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चालकांकडून होत आहे.