लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शैक्षणिक सत्र २०२०-२ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी पालकांकडून एकरकमी किंवा तीन, चार महिन्यातून एकाच वेळी या पद्धतीने शैक्षणिक शुल्काची वसुली न करता, पालकांच्या सोयीनुसार टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्क स्वीकारावे, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व शैक्षणिक संस्थांना १३ जून रोजी दिल्या.यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने शाळा केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्ट सूचना शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या नाहीत. दरम्यान, प्रत्येक शाळांनी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली असून, शैक्षणिक शुल्काची आकारणी एकाच वेळी तसेच तीन, चार महिन्यातून एकदा एकरकमी करण्याच्या सूचना पालकांना दिल्या जात आहेत. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वच व्यवहार प्रभावित झाले आहेत. यामधून शैक्षणिक क्षेत्रही सुटू शकले नाही. यापृष्ठभूमीवर इंग्रजी माध्यमाने जादा शैक्षणिक शुल्काची आकारणी पालकांकडून करू नये तसेच एकरकमी शैक्षणिक शुल्क न घेता, पालकांच्या सोयीनुसार शैक्षणिक शुल्काची आकारणी करावी, विविध टप्प्यात शैक्षणिक शुल्क घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मानकर यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिल्या. पालकांनीदेखील टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्काचा भरणा करावा, असे आवाहन मानकर यांनी केले. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने शाळा नेमक्या केव्हा सुरू होतील, हे अद्याप निश्चित झाले नाही. दरम्यान, शाळांनी पालकांकडून टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्क आकारावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. पालकांनीदेखील आपल्या सोयीनुसार टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्काचा भरणा करावा.- अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी
टप्प्याटप्प्याने भरता येणार शैक्षणिक शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:15 AM