प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी केले, तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कीटक शास्त्रज्ञ कथा कडधान्य पीक प्रात्यक्षिक प्रभारी राजेश डवरे व कृषी अर्थशास्त्रज्ञ डिगंबर इंगोले यांनी भूमिका पार पाडली. डॉ. रवींद्र काळे यांनी प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिले जाणारे कमी खर्चाचे तूर पीक उत्पादन व पीक संरक्षण तंत्रज्ञान याचा आगामी खरीप हंगामात अंगीकार करून उत्पादन खर्चात कपात करावी व बीजोत्पादनाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन केले. तांत्रिक सत्रात कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी तूर उत्पादन व पीक संरक्षण यासंदर्भात विस्तृत विवेचन केले. तसेच तूर पीक प्रात्यक्षिकात शेतकऱ्यांच्या शेतावर दिल्या गेलेल्या बीडीएन-७१६ या वाणाची वैशिष्ट्य तसेच तूर पिकात शेंडा खुडणीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिगंबर इंगोले यांनी तूर पिकातील अर्थशास्त्र विशद करताना या पिकात कोणत्या खर्चात बचत होऊ शकते याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशिक्षणात शेवटी प्रगतिशील शेतकरी दत्तराव इंगोले यांचे शेतातील तूर पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात प्रशिक्षणासाठी शेलगाव ओमकारगीर येथील समस्त शेतकरी बंधूंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे भगवान देशमुख यांनी केले.
--------
तुरीवरील किडींच्या माहितीसह मार्गदर्शन
शेलगाव ओंकारगीर येथे आयोजित तूर पीक प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमात कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी पिकावरील विविध किडी व त्यांचे जीवनचक्र यावर प्रकाश टाकला तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण करताना शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण केले.