चलन तुटवडा: खरीपाच्या तयारीवर परिणामवाशिम: बाजारात शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. खरीपाची तयारी आणि पिककर्जाचा भरणा करण्यासाठी त्यांना मोठा त्रास होत आहे.शासनाने नोव्हेंबर २०१६ ला केलेल्या नोटाबंदीचे परिणाम अद्यापही व्यवहारावर असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात मागील महिनाभरापासून चलन तुटवडा निर्माण झाला आहे. बँकेतील विड्रॉलवरची मर्यादा उठविली; परंतु रिझर्व्ह बँकेने रोखीचा पुरवठा कमी केल्याने स्टेट बँकेसह प्रत्येकच राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थांत चलन तुटवडा निर्माण झाला आहे. व्यापारी आणि मोठमोठे व्यावसायिकच नव्हे, तर सर्वसाधारण जनताही त्यामुळे त्रस्त झाली आहे. जनतेला कॅशलेस व्यवहार करण्यास बाध्य करण्याचा हा डाव, तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. बँकांकडून व्यापाऱ्यांना अल्प रकमेचा विड्रॉल मिळत असल्याने त्यांच्या खरेदीवर फारसा परिणाम होत नसला तरी, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सद्यस्थितीत बँकांनी कर्जवसुलीचा तकादा लावला आहे. त्यातच खरीपाच्या हंगामासाठी तयारीही करणे आवश्यक आहे. या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्याने घरात साठविलेला माल विकण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु बाजार समित्यामधील व्यापाऱ्यांकडे पैसाच नसल्यामुळे ते धनादेशाच्या रुपात चुकारा करीत आहेत. या धनादेशातून शेतकऱ्यांना बँकेचे कृज कमी करणे थोडे शक्य होत असले तरी, खरीपाच्या हंगामासाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी अडचण येत असल्याने रोखीने चुकारा मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
रोख चुकाºया अभावी शेतकरी अडचणीत
By admin | Published: April 03, 2017 4:58 PM