वाशिम : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान हे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. दहावी, अकरावीतील गुणांनी विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे.
कोरोनामुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ३६३ शाळा आहेत. बारावी निकालाचा तिढा सोडविताना, राज्य शिक्षण मंडळाने मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर केले आहे. यामध्ये दहावी व अकरावीतील गुणही विचारात घेतले जाणार असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे. अकरावीला ‘रेस्ट इअर’ समजणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
०००००००००००००००
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा !
कोट बॉक्स
बारावीनंतरच्या जेईई, नीट किंवा इतर परीक्षांवर विद्यार्थ्यांच्या विविध शाखेतील प्रवेश अवलंबून राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे.
्र_- प्रा. विजय पोफळे
.......
अंतर्गत मुूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल लागणार आहे. पुढील प्रवेश हे प्रवेश परीक्षेवर अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
- प्रा. आशीष सोळंके
०००००००००००००
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !
बारावीच्या निकालात दहावीचे ३० टक्के आणि अकरावीचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे बारावीच्या निकालाची धाकधूक आहे.
- समाधान देशमुख
....
दहावी आणि अकरावीतील गुण विचारात घेतले जाणार असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. अकरावीची परीक्षाच झाली नसल्याने गुणदान कसे होणार, हा प्रश्न आहे. या सर्व प्रक्रियेमुळे बारावीत गुण कमी मिळण्याची भीती आहे.
- निकिता मानोरकर, विद्यार्थिनी
००००००००००
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी सीबीएसई
मुले ७२
मुली ५८
....
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड
बारावीतील विद्यार्थी १८,१७५
मुले ९,८१४
मुली ८,३६१