कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशी वाहतूक पूर्णत: बंद केली होती. नवीन रुग्णसंख्येत वाढ होत नसल्याने, राज्य परिवहन मंडळाच्या वतीने काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. यामध्ये रिसोड आगाराच्या वतीने २५ मेपासून शासनाचा नियमांचे पालन करीत रिसोड ते अकोला दोन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. पहिली फेरी रिसोड येथून सकाळी आठ वाजता निघत असून, शिरपूर येथून नऊ वाजता अकोल्याकडे जात आहे. दुसरी फेरी रिसोड येथून सव्वादोन वाजता तर सव्वातीन वाजता शिरपूर येथून अकोल्याकडे मार्गस्थ होत आहेत. सदर बसफेऱ्यांची अकोल्याहून परतीची वेळ सकाळी अकरा वाजता व सायंकाळी साडेपाच वाजता आहे. शिरपूर येथून रिसोडकडे या बसफेऱ्या दुपारी एक वाजता व संध्याकाळी साडेसात वाजता जात असल्याची माहिती रिसोड आगाराच्या वतीने लिपिक राजू बेद्रे यांनी दिली आहे. यापूर्वी काही औरंगाबाद फेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
रिसोड आगाराच्या दोन बसफेऱ्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:43 AM