शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

वाशिमात दोन दिवस विशेष महिला मतदार नोंदणी शिबिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 2:40 PM

वाशिम  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे.

ठळक मुद्देमतदारांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच महिला मतदार संख्या वाढविणे यासाठी वाशिम तालुक्यात जनजागृती केली जात आहे. वाशिम तालुक्यात एकूण २० मतदान केंद्रांतर्गत दोन दिवस विशेष महिला मतदार नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे.३० व ३१ मे २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवीन महिला मतदारांची नोंदणी केली जाणार  आहे.

वाशिम  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या अंतर्गत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून ३० व ३१ मे २०१८ या कालवधीत तालुक्यातील २० मतदान केंद्रांतर्गत विशेष महिला मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती वाशिमचे तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली . 

मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच महिला मतदार संख्या वाढविणे यासाठी वाशिम तालुक्यात जनजागृती केली जात आहे. वाशिम तालुक्यात एकूण २० मतदान केंद्रांतर्गत दोन दिवस विशेष महिला मतदार नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. या अंतर्गत वाशिम तालुक्यातील २५४-वाशिम, २५६-कोकलगाव, १८६-काजलंबा, १८७- काजलंबा, २५७-वाशिम, २१८-वाशिम, २८१- पार्डी आसरा, १२४-कार्ली, १४६-तांदळी शेवई, २४६-वाशिम, २४३-वाशिम, २८९-अनसिंग, ३४०-जुमडा, २७०-वाशिम, ३१३-शिरपुटी, ३६१-जयपूर, ३०८-मोहगव्हाण डुबे, २५१-वाशिम, १६०-पांडव उमरा व ३१८-सावरगाव जिरे या मतदान केंद्रांतर्गत ३० व ३१ मे २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवीन महिला मतदारांची नोंदणी केली जाणार  आहे. या मतदान केंद्रांतर्गत १८ वर्षे पूर्ण केलेल्या महिलांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदविले नसल्यास या शिबिरादरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा वाशिम तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत नमुना-६ अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावे, असे आवाहन तहसीलदार अरखराव यांनी केले.

टॅग्स :washimवाशिम