कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील ग्राम मोखड येथील धरण्यात बुडून दोघांचा बुडून मुत्यु झाल्याची घटना२६ मे रोजी दुपारी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, ग्राम मोखड प्रिपी येथील धरणात गावातील शिवदास दत्ताराम बोबडे (५२) व चपंत उकंडा गायकवाड (५५) दोघे धरणाच्या काठावर नेहमीप्रमाणे गेले असता, पाय घसरून त्यांचा धरणात बुडून मुत्यु झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती होताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वानखडे व पोलीस कर्मचारी नितीन ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.