लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातील नंधाना येथील महापुरूषांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला निर्धारित जागेवर गावातीलच काही लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान, प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याचे पाहून १३ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दोघांनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.नंधाना ता. रिसोड येथील नमुना आठ मालमत्ता क्रमांक ६०३ मधील निर्धारीत क्षेत्रफळावर गावातील काही जणांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी महापुरूषांचा पुतळा आहे. पुतळा परिसराच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत नंधाना येथील काही जण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कोणतीच हालचाल दिसत नसल्याचे पाहून १४ नोव्हेंबर रोजी दोघांनी अंगावर रॉकेल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पळ काढला. हा प्रकार पाहून एकच धावपळ झाली. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी पाठलाग करीत या दोघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 5:38 PM