०००००
जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यासह नियमित स्वच्छताही ठेवली जात नाही. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
०००
मोबदल्यापासून शेतकरी वंचित
वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजचे पाणी शेतात घुसत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही अद्यापही भरपाई मिळाली नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी केली.
०००
आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी
वाशिम : परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी धोबी समाज महासंघाने जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे मंगळवारी केली. देशाच्या १७ राज्यांत धोबी समाज हा अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट आहे.
००
शिरपूर येथे कोरोना जनजागृती
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आणखी चार जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी निष्पन्न झाले. वाढता कोरोना संसर्ग पाहता गावात आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे.
०००
घरकुलांचा शेवटचा हप्ता प्रलंबित
वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून दीड वर्ष होऊनही कारंजा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळाला नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी लाभार्थ्यांनी बुधवारी केली.
००
रिसोड येथे दुपारनंतर शुकशुकाट (फोटो)
रिसोड : कडक निर्बंध लागू असून, सकाळी ११ वाजतानंतर मेडिकल, दवाखान्याचा अपवाद वगळता सर्व बाजारपेठ कडकडीत बंद असते. त्यामुळे दुपारनंतर रिसोड शहरात शुकशुकाट असतो. प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात असतो.
००
गुडमॉर्निंग पथकाच्या भेटी मंदावल्या
वाशिम : रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, वाशिम, मानोरा तालुक्यातील गावांमध्ये भेटी देत उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांचा शोध गुडमॉर्निंग पथकाच्यावतीने घेतला जात होता. कोरोनाचा संसर्ग वाढताच गुड मॉर्निंग पथकाच्या भेटींवरही मर्यादा आल्या.
००००००
उंबर्डाबाजार येथे आरोग्य तपासणी
वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाली असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
००००
अनसिंग परिसरात वीजपुरवठा सुरळीत
वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे.
०००००००००००००
धनज येथे वाहन तपासणी
वाशिम : धनज (ता. कारंजा ) परिसरात गत दोन दिवसांत पोलिसांच्या पथकाने मार्गावर उभे राहून वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी अनेकांना आर्थिक दंडदेखील करण्यात आला.