वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढत आहे. रविवारीदेखील वाशिम तालुक्यात १४२ जण कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. एकूण ४६९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १४२, मालेगाव तालुक्यातील ८०, रिसोड तालुक्यातील ७३, मंगरुळपीर तालुक्यातील ८२, कारंजा तालुक्यातील ३६ आणि मानोरा तालुक्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३८ बाधितांची नोंद झाली असून, ४४८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी कडक निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
०००००००००००
ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, गृहविलगीकरणाच्या नियमाचे पालन करावे, सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे आढळून येताच तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
००
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह : ३२,०७५
ॲक्टिव्ह : ४,४९६
डिस्चार्ज : २७,२४३
मृत्यू : ३३४