जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्युसंख्येतही घट येत असल्याचे आशादायी चित्र आहे. बुधवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने ८३ रुग्ण आढळून आले तर ११४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील १२ बाधितांची नोंद झाली आहे. मालेगाव तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००००००००००
८१२ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने ८३ रुग्ण आढळून आले तर ११४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ८१२ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
मंगरूळपीर तालुक्यात एक रुग्ण आढळला
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. बुधवारच्या अहवालानुसार मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे रुग्ण आढळला. वाशिम शहरात ६ रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भगाात १८ रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात आठ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळून आले. कारंजा शहरात चार तर ग्रामीण भागात पाच रुग्ण आढळून आले. मानोरा शहरात दोन तर ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळून आले.